Dada Bhuse Rain
Dada Bhuse Rain  
मुख्य बातम्या मोबाईल

दादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार 

सरकारनामा ब्युरो

अमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे (Heavy rains in area from last two days which results in crop loss) नुकसानीच्या पाहणीसाठी थेट बांधावर जात आहेत. यावेळी झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी (Minister will take review of crop loss today also) ते आज देखील करणार आहेत.

तत्पूर्वी त्यांना इफको-टोकियो या विमा कंपनी विरोधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा अमरावती शहरातील काँग्रेस नगर रोड स्थित इफको-टोकियो या विमा कंपनीच्या कार्यालयाकडे कडे वळविला.

पीक विमा मिळण्यासाठी कंपनीच्या  प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ कऱण्यात येत होती. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नव्हते. सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषी मंत्री भुसे यांनी स्वतः इफको-टोकियो या  विमा कंपनीमध्ये ही भेट दिली होती. त्यांनी विविध बाबींची तपासणी केली. 

यावेळी कार्यालयात आवश्यक कार्यवाहीसाठी यंत्रणा आढळून आली नाही. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. उपस्थित प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे मंत्री भुसे यांना योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या वेळी जिलाधिकारी व कृषि विभागाचे सर्वच अधिकारी उपस्थित होते
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT